सावंतवाडी,दि.२४ : विद्यार्थ्यानी शिक्षणाचा उपयोग हा पुस्तकी ज्ञाना पुरता न करता आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य दाखवले पाहिजे ज्ञान आत्मसात केले पाहिजे तर तुम्ही भविष्यात एक यशस्वी उद्योजक बनाल असे मत सावंतवाडीचे प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी मांडले.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी च्या वतीने येथील रविंद्र मंगल कार्यालयात करण्यात आले होते.त्यावेळी पानवेकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंखे, तहसीलदार अरुण उंडे,गटविकास अधिकारी व्ही.एन.नाईक, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी ए.एस.मोहारे, सहआयुक्त ग.प्र.बिटोडे, प्राचार्य एन.डी. पिंडकुरडवार, जे.एस.गवस, आर.ए.जाधव,पी.पी.ढवळ,यु.आर.गवस,शिवानी गरड, एस.बी.जाधव आदि उपस्थित होते.
पानवेकर म्हणाले,आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या करिअर चा विचार हा केलाच पाहिजे जर तुम्ही विचार करून एखादी गोष्ट केली तर त्याला एक वेगळी दिशा मिळते म्हणूनच आपल्या देशात अनेकजण उच्च पदावर जाऊन बसले त्याचे एक ध्येय होते.त्याच बरोबर त्याला करिअर जोड होती तसेच काम तुमच्या घडावे असे सांगत त्यांनी वेगवेगळी उदाहरणे ही यावेळी दिलीत.
जाधव यांनी ही विद्यार्थ्यानी करिअर कशा प्रकारे केले पाहिजे हे पटवून दिले तसेच तुम्ही प्रत्येकाने पुस्तकी ज्ञान घेत असतना प्रत्यक्ष ज्ञानावर ही भर द्या असे सांगितले तर मोहारे यांनी विद्यार्थ्यानी कष्टाची जोड दिली पाहिजे कोणतेही ज्ञान आत्मसात करतना ते परिपूर्ण करा तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल असे सांगितले.या निमित्ताने येथील रविंद्र मंगल कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे स्टाॅल ही उभारण्यात आले होते.त्यात प्रत्येक स्टाॅल ची माहिती ही विद्यार्थ्यांना देण्यात येत होती.
Home ठळक घडामोडी विद्यार्थ्यानी शिक्षणाचा उपयोग हा पुस्तकी ज्ञाना पुरता न करता आपल्या आवडीच्या क्षेत्रात...