तालुका पत्रकार संघाच्या नेत्र तपासणी शिबिरामध्ये शंभर जणांनी केली तपासणी..

0
81

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी,दि.१८: सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, नँब तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्र नाशिक सिंधुदुर्ग युनिट, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि मुक्ता ऑप्टिशन्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचा कार्यक्रम बुधवारी १७ मे रोजी सावंतवाडी भटवाडी येथील नँब च्या नेत्र रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. या नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रमाला पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शंभरहून अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची डोळे तपासणी नँब च्या अत्याधुनिक नेत्र रुग्णालयामध्ये करण्यात आली. आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून या मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. तालुका पत्रकार संघ, नँब सिंधुदुर्ग, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि मुक्ता ऑप्टिशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची नेत्र तपासणी करण्यात आली. सुरुवातीला तालुका पत्रकार संघाच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. तदनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच पुजन करत पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन नॅब सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्षा डॉ. विनया बाड, नँब सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगांवकर, सौ. निलिमा चलवाडी, मुक्ता ऑप्टीशीयनचे रवी लोखंडे, उद्योजक उदय भोसले, डॉ. सुप्रिया भावके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करताना उदय भोसले म्हणाले, राजकारणात काम करत असताना समाजकारणाची ओढ निर्माण झाली होती. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार त्यावेळी अंगिकारला होता. समाजासाठी काम करताना वेगळा आनंद मिळतो. तर रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. विनया बाड म्हणाल्या, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी गेली अनेक वर्षे काम करत आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या पुढाकारातून पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रमाच आज आयोजन केले. पत्रकार संघाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. येणाऱ्या काळात देखील पत्रकार संघाच्या सामाजिक उपक्रमात रोटरी क्लब सावंतवाडीचा सहभाग राहील असं मत त्यांनी व्यक्त केले. तर नँब सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अनंत उचगांवकर यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड युनिट महाराष्ट्रच्या माध्यमातून सावंतवाडीत भटवाडी येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुरु करण्यात आलेल्या नेत्र रुग्णालयाबद्दल माहिती दिली. याठिकाणी असणारी सुसज्ज यंत्रणा, तज्ञ डॉक्टरांचा सावंतवाडीकरांना फायदा होईल, नागरिकांचे नेत्रविकार दुर होतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तर पत्रकार हे समाजाचा दुवा असतात त्यामुळे या कार्यक्रमातून समाजातील घटकांना नॅबच्या कार्याबद्दल माहिती मिळेल व नेत्र विकार दुर होण्यास मदत होईल असं मत व्यक्त करत आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात सिंधुदुर्गचे सुपुत्र,आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केल. बाळशास्त्रींच स्मारक असणाऱ्या सिंधुदुर्ग पत्रकार भवनाच्या वाटचालीबद्दल त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. चोविस तास समाजासाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचा डोळ्यांची काळजी घेण्यासाठी सावंतवाडी तालुका पत्रकार संघान घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांचा कारकीर्दीतील पहिलाच कार्यक्रम हा समाजाभिमुख आहे असं मत व्यक्त करत त्यांनी तालुका पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी मोफत नेत्र तपासणी नँब सिंधुदुर्ग, मोफत चष्मे वाटप मुक्ता ऑप्टीशीयन, नेत्र चिकित्सा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या माध्यमातून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी, निलिमा चलवाडी, रवी जाधव यांचे विशेष सहकार्य या लाभले. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी अध्यक्षा डॉ. विनया बाड, नँब सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष अनंत उचगांवकर, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अभिमन्यू लोंढे, मुक्ता ऑप्टीशीयनचे रवी लोखंडे, उद्योजक उदय भोसले, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कोकणसादचे संपादक सागर चव्हाण, पत्रकार माजी अध्यक्ष प्रविण मांजरेकर, जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर अँड. संतोष सावंत, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, सौ. निलिमा चलवाडी, डॉ. सुप्रिया भावके, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उपाध्यक्ष काका भिसे, दिपक गांवकर, प्रसन्न राणे, सहसचिव विनायक गांवस, रमेश बोंद्रे, विजय देसाई, नरेंद्र देशपांडे, हेमंत खानोलकर, हर्षवर्धन धारणकर, बंटी उसगावकर, रूपेश हिराप, राजू तावडे, सचिन रेडकर, उमेश सावंत, शैलैश मयेकर, मंगल कामत, नागेश पाटील, आनंद धोंड, सिद्धेश सावंत, शुभम धुरी, अशोक बोलके, प्रसाद माधव, अनुजा कुडतरकर, अनुराधा पवार, संजना निवळे, सुनिता ठाकुर, स्नेहल चराठकर, वैभव सावंत, अजित दळवी, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात १०० हून अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. त्यांची नेत्र चिकित्सा करत मोफत चष्मे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार राजेश मोंडकर यांनी तर आभार रामचंद्र कुडाळकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here