0
99

वेंगुर्ला मनसे माजी तालुका सचिव राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्या वाढदिवसानिमित्त ०५ मे रोजी रक्तदान शिबिर..

सिंधुदुर्ग, दि.२९: जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,शाखा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ५ मे २०२३ रोजी आरवली सुपुत्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला माजी तालुका सचिव श्री राजाराम उर्फ आबा चिपकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरवली येथील साळगावकर मंगल कार्यालय येथे दिनांक ५ मे २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व रक्तदात्यांनी ह्या रक्तदान शिबिरामध्ये उपस्थिती दर्शवून रक्तदान करून रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्ला यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here