सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.ओंकार अशोकराव कुबडे यांनी स्वीकारला पदभार …
सावंतवाडी, दि.१८: तालुक्यातील सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात कित्येक दिवस वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस डॉक्टर पद रिक्त असल्यामुळे येथील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.
मात्र सांगेली सरपंच श्री लवू भिंगारे यांनी याबाबत वारंवार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे हे रिक्त पद लवकरात लवकर भरण्यात यावे यासाठी मागणी केली होती.
अखेर काल सोमवार १७ एप्रिल रोजी संध्याकाळी सांगेली येथील आरोग्य केंद्र येथे नवीन एमबीबीएस डॉ. ओंकार अशोकराव कुबडे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता अखेर सरपंच लवू भिंगारे यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे रिक्त पद तात्काळ भरल्याने येथील ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान नवीन अधिकाऱ्यांचे सरपंच लवू भिंगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सांगेली ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे गावात स्वागत केले.
यावेळी माजी जि.स. पंढरी राऊळ, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी कदम, सागर सांगेलकर,गौरी राऊळ, रसिका आईर, शितल राऊळ, श्रावणी राऊळ, संतोष नार्वेकर,पुरुषोत्तम राऊळ, सुमन सांगेलकर, ग्रामविकास अधिकारी कांता जाधव, अंगणवाडी सेविका आशा सेविका आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.