भोसले नॉलेज सिटी चे संस्थापक अच्युत सावंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन..
सावंतवाडी,दि.१८: तालुक्यातील निरवडे येथील श्री देव भूतनाथ देवस्थानच्या वर्धापनानिमित्त आयोजित कार्यक्रमात येथील माळकरवाडी महापुरुष कला क्रीडा मंडळ यांच्याकडून सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी गावातील नव उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन भोसले नॉलेज सिटी चे संस्थापक अध्यक्ष सावंत भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँक संचालक विद्याधर परब,अँड. अनिल निरवडेकर, ठाकरे गट शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ, खरेदी विक्री संघ चेअरमन प्रमोद गावडे, सरपंच सौ. सुहानी गावडे, माजी सरपंच सदा गावडे, ब्रेकिंग मालवणी चे संपादक अमोल टेंबकर, नयनेश गावडे,शैलेश मयेकर, निखिल माळकर,आनंद धोंड,अर्जुन पेडणेकर, दशरथ मल्हार,माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पांढरे,बाळा गावडे, विजय गावडे, भगवान गावडे, लाडू गावडे, संजू गावडे ,भालचंद्र गोसावी, संतोष गोसावी, चंदन गोसावी सर,शुभम धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवउद्योजकांमध्ये सरपंच सौ.सुहानी गावडे,सुनील माळकर,भूषण बांदिवडेकर, प्रथमेश धारगळकर, दत्ताराम गावडे, प्रज्वल जोशी, गायत्री वेतोरकर, साईनाथ पवार, अरविंद गावडे, प्रियंका गावडे, तन्वी गोसावी,साई बांदिवडेकर, सत्यम मल्हार, शिवाजी गावडे, आनंदी पवार, सुरज बाईत, तुषार पवार,सुशांत कोळेकर, नरेश राऊळ,किरण बाईत, या सर्व सत्कारमूर्तींना शाल श्रीफळ, व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
दरम्यान कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना अच्युत सावंत भोसले यांनी महापुरुष कला क्रीडा मंडळ निरवडे माळकरवाडी या मंडळाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार निखिल माळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याच गावातील नवोद्योजकांचे केलेले सत्कार हे त्या नव उद्योजकांना प्रेरणा देणारे ठरेल आणि मंडळाने आयोजित केलेल्या या सत्कार समारंभाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना चंदन गोसावी सर यांनी केली, तर आभार प्रमोद गावडे यांनी मानले.
या कार्यक्रमा दरम्यान रात्री उशिरा पत्रकार अमोल टेंबकर प्रस्तुत ओंकार कला मंच सावंतवाडी यांचा कलाविष्काराचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.