सावंतवाडी पोलीस स्थानकात अपहरणाची नोंद दाखल..
सावंतवाडी,दि.१५ : आंबोली येथील एका आश्रमात शिकणारा त्रिपुरा येथील विद्यार्थी पळून गेला आहे.याबाबत पोलीस ठाण्यात अपहरणाची नोंद करण्यात आली आहे.त्या मुलाला घरातील व्यक्तींनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने तो पळून गेला असावा असा अंदाज आश्रमातील व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तशी नोंद केली आहे ही घटना शनिवारी पहाटे उघड झाली हा मुलगा सोळा वर्षाचा आहे तो मूळ त्रिपुरा येथील आहे.
आंबोली येथे सुरू असलेल्या एका आश्रमात तो राहत होता बाजूला असलेल्या शाळेत तो शिक्षण घेत होता त्या ठिकाणी आश्रमात तब्बल २३ मुले आहेत चार खोल्यात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आज सकाळी तेथील व्यवस्थापकाने नेहमी प्रमाणे पाहणी केली असता तो मुलगा आढळून आला नाही त्यामुळे त्याची सहका-यांकडे चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान अन्य एका आश्रमाच्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून त्याने आपल्या घरी फोन लावला होता तसेच मोबाईल घेण्यासाठी पैसे द्या अन्यथा मी येथून निघून जाईन अशी त्यांनी घरातील आई-वडिलांना सांगितले होते अशी माहिती त्या व्यवस्थापकाने पोलिसांना दिली आहे त्यानुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेगडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.