सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ अनामिका चव्हाण यांची माहिती..
सावंतवाडी, दि.१३ : येथील राजवाड्याच्या समोरील तलावाचा कोसळलेला कठडा दुरुस्त करण्यात येणार असून त्यासाठी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाची निर्विदा प्रकिया होणार असल्याची माहिती सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी दिली.
दरम्यान येथील तीन मुशी परिसरातील कोसळलेल्या कठड्याचे काम पूर्ण झाले असून आता काही दिवसात फुटपाथचे काम पुर्ण करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे यांनी मोती तलावातील गाळ काढताना राजवाड्यासमोरील कोसळलेला कठडा दुरुस्त व्हावा असे त्यांनी म्हटले होते.याबाबत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली त्या म्हणाल्या तलावाच्या कठड्याचा भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ हे काम करण्याची मागणी करण्यात आली होती.
मुंबई गोवा महामार्गाला नुकसान होऊन त्यासाठी हे काम युद्धपातळीवर करण्यात आले आता फुटपाथचे काम हाती घेण्यात येणार आहे तर दुसरीकडे राजवाड्याच्या समोरील खचलेला कचऱ्याचा भाग दुरुस्त करण्यासाठी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती याबाबतच्या सूचना मंत्री दीपक केसरकर यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत दिली होती.
तसेच तात्काळ हे काम हाती घेण्यात यावे अशा सूचना दिल्या होत्या त्यानुसार न्यायालयाच्या लागून असलेल्या कठड्याचे काम हातात घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले या कामासाठी ९१ लाखाचा निधी मंजूर झाला आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.