उद्योजक निलेश चव्हाण यांच्यामुळे आले दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हासू

0
141

कुत्रिम अवयव मोफत वाटप शिबिराचा असंख्य दिव्यांग बांधवांनी घेतला लाभ

चिपळूण, दि.१३: उद्योजक निलेश चव्हाण यांच्यामुळे दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आसू आले आहेत.निलेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने दिव्यांग बांधवाना येत्या २६ मार्च रोजी मोफत कुत्रिम अवयव् मिळणार आहेत.
उद्योजक निलेश चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने स्कॉन प्रो. फौंडेशन पुणे व रोटरी क्लब ऑफ स्काँन प्रो. पुणे,रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री पद्मावती संकुल, पाली रोड, पवन तलाव जवळ, मार्कंडी रविवारी मोफत दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.चिपळूण आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून असंख्य दिव्यांग बांधवांनी या शिबिरात आपली नावे नोंदवून लाभ घेतला अत्याधुनिक पद्धतीचा कृत्रिम पाय (मॉड्युलर लेग) व कृत्रिम हात आणि कॅलिपर मोफत
मॉड्युलर लेग कमर्शियल किमंत बाहेर ₹ ५० हजार पेक्षा जास्त व कृत्रिम हात ₹ १५ हजाराचे शिबिरात मोफत स्वरूपात देण्यात येणार असून काल रविवारी झालेल्या शिबिरामध्ये गरजवंत दिव्यांग बांधवांच्या मागणी नुसार कुत्रिम अवयवांचे मोजमाप घेऊन त्या दिव्यांग बांधवांना २६ मार्च रोजी संबंधित अवयव देण्यात येणार आहेत अशी माहिती या वेळी येथे बोलतांना या शिबिराचे मुख्य प्रायोजक
स्कॉन प्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेडचे
संस्थापक आणि कार्यकारी संचालक
श्री .निलेश चव्हाण यांनी दिली.
रविवार, दि.१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या या शिबिरात चिपळूण कॅम्प मध्ये दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक मोड्यूलर कृत्रिम पाय ४५, हात ५, व कॅलिपर २६ असे एकूण ७६ कृत्रिम अवयव देण्यासाठी मापे घेतली गेली. सदर मापेनुसार याच दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप कार्यक्रम रविवार दि.२६ मार्च रोजी सकाळी १० वाजता चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे.एस्काँन प्रो. फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त निलेश चव्हाण, सौ.नंदिनी चव्हाण,रोटरी क्लब ऑफ एस्काँनचे अध्यक्ष महेश मायदेव, रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष महावीर सत्यण्णा, भारत विकास परिषदेच्या नवभारत विकास फौंडेशनचे विश्वस्त दत्ताजी चितळे , जितेन्द्र् घोणे,अनिरुद्ध पाटणकर,शैलेश मोरे,किशोर गुजर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या शिबिरास रोटरी क्लब ऑफ एस्कॉन प्रो, रोटरी क्लब ऑफ चिंचवड, रोटरी क्लब ऑफ चिपळूण व रोटरी क्लब ऑफ लोटे यांच्या सभासदांचे विशेष सहकार्य लाभले.स्थानिक पातळीवर कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था एस्कॉन प्रोजेक्टच्या माध्यमातून करण्यात आली.शिबिराच्या स्थळी दिव्यांग व्यक्ती व सोबत आलेल्या सहकारी व्यक्तीस मोफत भोजन रोटरी क्लब तर्फे देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्कॉन प्रो. फौंडेशन पुणे व रोटरी क्लब ऑफ स्काँन प्रो. पुणे,रोटरी क्लब ऑफ चिंचवड आणि भारत विकास परिषद विकलांग केंद्र यांच्या सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here