कणकवली,दि.०९ : सिंधुदुर्गातील साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून यानिमीत्ताने कणकवली नगर वाचनालय येथे आयोजित केलेल्या त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून प्रा. प्रवीण बांदेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी नागरी सत्कार सोहळ्याला माजी केंद्रीय कायदा मंत्री.रमाकांत खलप (गोवा), इन गोवा २४x७ चे संपादक प्रभाकर ढगे, मराठीतील महत्त्वाचे कवी वीरधवल परब, कवी समीक्षक प्रा. डॉ.गोविंद काजरेकर, प्रा. डॉ. शरयू आसोलकर, कवी अनिल धाकू कांबळी, कवी मोहन कुंभार, अखंड लोकमंच कणकवलीचे नामानंद मोडक, नाटककार शफाअत खान आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्राध्यापक बांदेकर यांचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.