शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा पुढाकार..
कणकवली,दि.१२: तालुक्यातील बोर्डवे येथे आज शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दीपावलीचे औचित्य साधुन प्राथमिक आश्रमशाळेतील निराधार, गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह, शैक्षणिक साहित्य वाटप , बेडशीट वाटप तसेच दीपावली निमित्त पणती वाटप अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

त्याप्रसंगी आश्रम शाळेचे अध्यक्ष भालचंद्र गोसावी, मुख्याध्यापक आनंद कर्पे, शिवस्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत खांबळ, यांच्यासह सदर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग ,विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे खजिनदार स्वप्नील गोसावी, सचिव सौ.प्रीती गुरव, सदस्य अविनाश साटले, रोहित बेंडल, अभिजित गोसावी यांनी उत्तमरित्या पार पाडले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयुर गोसावी यांनी विद्यार्थांना पुढील शालेय वाटचालीस शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले व महाराष्ट्र गीताने सांगता करत कार्यक्रम संपन्न झाला.




