श्रीदेवी पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे हायस्कूलची एसएससी परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा कायम..

0
25

कुमारी जागृती राऊळ ८७.८० % गुण मिळवून प्रशालेत प्रथम

सावंतवाडी,दि.१३: तालुक्यातील श्रीदेवी पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगे हायस्कूल ने एसएससी परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यामध्ये कुमारी जागृती राऊळ ८७.८० % गुण मिळवून प्रशालेत पहिली आली. तर कुमार सर्वेश शिर्के ८४.६० गुण मिळवत द्वितीय तर कुमार यश घावरे ८४.००% गुण मिळवत तिसरा आला, कुमार साईराज गुंडू धोंड ८३.६०% गुण मिळवून चौथा तर कुमारी ऋतुजा जाधव व कुमार सुरेश परब अनुक्रमे ८०.२०% गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे संचालक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here