सावंतवाडी येथे २०० हून अधिक मंडळांना मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळाकडून भजनी साहित्याचे वाटप..

0
33

सावंतवाडी,दि.०३ : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून श्री गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील काझी शहाबुद्दीन हॉल येथे मतदार संघातील सुमारे २०० भजन मंडळांना भजनाचे साहित्य वाटप करण्यात आले.

दरम्यान सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील ७५० भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात येत असून त्यात सावंतवाडी तालुक्यातील २०० भजन मंडळांना भजन साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुका प्रमुख नारायण राणे आदी शिवसेना शिंदे गट पदाधिकारी उपस्थित होते. भजन साहित्यामध्ये मृदुंग व टाळ असे साहित्य वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here