शिरशिंगे ग्रामपंचायतवर भाजपचे वर्चस्व..

0
206

सरपंच श्री दिपक राऊळ तर उपसरपंच म्हणून सचिन धोंड यांची आज बिनविरोध निवड

सावंतवाडी,दि.३०: तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायतीची उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी माळकर व ग्रामविकास अधिकारी तारी यांच्या उपस्थितीत आज पार पडली. यामध्ये भाजप पुरस्कृत सचिन धोंड यांच्या गळ्यात बिनविरोध उपसरपंच पदाची माळ पडली.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच दिपक राऊळ, माजी सरपंच श्री नारायण राऊळ, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देसाई माजी सरपंच सौ.रेखा घावरे,माजी सदस्य संदीप राऊळ,सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ ,नवनिर्वाचित सदस्य बाळकृष्ण पेडणेकर, श्रीमती माधवी राऊळ, श्री लक्ष्मण राऊळ, श्री ज्ञानदेव राऊळ, श्रीमती लक्ष्मी राऊळ, श्रीमती वनिता परब, श्रीमती नमिता राऊळ,श्रीमती सुषमा परब, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे,गुणाजी धोंड, गणपत राऊळ ,शांताराम राऊळ, तुकाराम धोंड,चंद्रकांत परब, पोलीस पाटील गजानन राऊळ,अंकुश परब,जीवन लाड, न्हानु घावरे,राजेंद्र सावरवाडकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये शिरशिंगे गावातील सरपंच श्री दिपक राऊळ व नवनिर्वाचित उपसरपंच सचिन धोंड यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन सरपंच व उपसरपंच यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच आणि उपसरपंच पद आपल्याकडे ठेवत भाजपने शिरशिंगे ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here