सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांची माहिती
सावंतवाडी,दि.२९ : तालुक्यातील कलंबिस्त मळा येथे पूरक नळ पाणी योजना तसेच रस्त्यांचे मजबुतीकरण आधी विविध विकास कामे भाजपच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत.
या गावाचा विकास निश्चितपणे भाजपच्या माध्यमातूनच केला जाणार आहे आणि यापूर्वीही मोठ्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच पंधराव्या वित्त आयोगातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे कलंबिस्त मळा भागातील नागरिकांना पाण्याची गैरसोय होत होती त्यासाठी पूरक नळ योजना आता उभारण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांनी दिली.
तसेच वेर्ले,रस्ता व नामदेव पास्ते यांच्या घरापर्यंत चा रस्ता आधी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर ,चर्च चे फादर, अंतोन रोड्रिक्स,पंढरीनाथ राऊळ,सरपंच शरद नाईक, बाबी पास्ते, नामदेव पास्ते,झुझे रॉड्रिग्ज,अशोक राऊळ,संदेश बीडये,बाळू सावंत,शालू फर्नांडिस, प्रिया करडोस,पिटर वेले माजी उपसरपंच श्री राऊळ दी कार्यकर्ते मोठ्याप्रमणावर उपस्थित होते.