सावंतवाडी,दि.२८: माजगाव सावंतवाडी पंचम नगर येथील नवीन जागेत मनोज सावंत यांच्या श्री देव पाटेकर व्हील केअर च्या नव्या दालनाचे उद्घाटन सैनिक नागरी सहकारी पतसंस्था चे चेअरमन श्री बाबुराव कविटकर यांचे हस्ते तर जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉटन्स यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
माजगाव दत्त गुरु निवास, पंचम नगर, डॉ. जेवरे यांच्या बंगल्या समोर मनोज सावंत यांनी श्री देव पाटेकर व्हिल केअर नवीन जागेत स्थलांतर केले त्यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अँड अमाेल कवीटकर ,श्री विनोद सावंत, प्रसाद सावंत, अभिलाष देसाई, आकाश सावंत तसेच मान्यवर उपस्थित होते.