क्षेत्रपालेश्वर सहकारी पतपेढी होडावडे मुंबईचे अध्यक्ष विजय गावडे यांचे आकस्मित निधन

0
87

सावंतवाडी,दि.३१: क्षेत्रपालेश्वर सहकारी पतपपेढी होडावडे मुंबई अध्यक्ष आणि होडावडे ग्रामोन्नती मंडळाचे मुंबई अध्यक्ष विजय जनार्दन गावडे यांचे अल्पशा आजाराने दुुख:द निधन झाले. विजय जनार्दन गावडे हे मुंबई येथील विविध सामाजिक संस्थांवर कार्यरत होते. होडावडे गावातील मुंबई येथे असणारी क्षेत्रपालेश्वर सहकारी पतपेढीचे गेली अनेक वर्षे अध्यक्ष होते. तसेच पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष होते,त्यानी या पतपेढीचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळला होता.तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी नेहमी त्यांचे सहकार्य असायचे. शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले होते. त्याच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here