मनसे सिंधुदुर्ग शिष्टमंडळाने घेतली नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट व केले स्वागत…

0
120

मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

सिंधुदुर्ग,दि.२४: जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या (हायवेच्या) बाबतीतले प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, जिल्ह्यात शासकीय आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता व त्यातून जनतेची होणारी गैरसोय,मच्छिमारांचे प्रश्न, पर्यावरण समतोल अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी काम केले असल्याने एकंदर भौगोलिक परिस्थिती आपल्याला पूर्णपणे ज्ञात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करण्याची ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांना दिली व जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.यावेळी कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाबल गावडे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमोल जंगले, राजेश टंगसाळी,वैभव धुरी, संतोष सावंत आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here