सावंतवाडी,दि.०९: सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे येथील ग्रामदैवत श्री देवी पावणाई रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या, मंगळवार, दिनांक ९ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.

या जत्रोत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ओटी भरणे, नवस बोलणे आणि नवस फेडणे यांसारखे विधी होणार आहेत.
रात्री उशिरा आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
शिरशिंगे येथील ग्रामस्थ, गावकरी मंडळी आणि देवस्थान कमिटी यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना या वार्षिक जत्रोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



