सावंतवाडी,दि.१८: तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि किल्ले मनोहर मन–संतोष गडाच्या पायथ्याशी वसलेल्या शिरशिंगे गोठवेवाडी येथे उद्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव उत्सव साजरा होत आहे.
येथील श्री देव गोठेश्वर ग्रामविकास मंडळ व शिवतेज मित्र मंडळ गोठवेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
सकाळी ७.३० वाजता किल्ले मनोहर मन–संतोष गडावरून शिवज्योतीचे आगमन झाल्यानंतर सकाळी नऊ वाजता शिवप्रतिमेचे व शिवज्योतीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर दहा वाजता अल्पोपहार सकाळी (१०)दहा ते दुपारी एक(१) वाजेपर्यंत उपस्थित मान्यवरांचे सत्कार व विविध सांस्कृतिक कार्यक्रम तर दुपारी एक ते तीन या वेळेत स्नेहभोजन संध्याकाळी तीन ते चार महिलांसाठी जिजाऊ बचत गटामार्फत हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी सात वाजता दीपोत्सव त्यानंतर ७.३० वाजता सामूहिक राज्य गीत गायनानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.
याबाबतची माहिती शिरशिंगे माजी सरपंच सुरेश शिर्के यांनी कोकण दर्शन डिजिटल मीडियाला दिली आहे.