शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाजाने व हिदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-सीताराम गावडे

0
23

शिवप्रेमी संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटनेचे आयोजन

सावंतवाडी,दि.१८: शिवप्रेमी संघटनां सावंतवाडी, बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटना,यांनी शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या बाईक रॅली व सभेला सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती कार्यक्रम यशस्वी करून हिदू समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवप्रेमी संघटनां, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद,गोरक्षक संघटना,यांनी १९ फेब्रुवारीला शिवजयंती निमित्त बाईक रॅली व त्या रॅली चे रुपांतर गांधी चौक सावंतवाडी येथे सभेत होणार आहे, संध्याकाळी साडे चार वाजता वाजता कोकण काॅलनी येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून रॅली ला सुरवात होऊन तिचे संध्याकाळी सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे सभेत रुपांतर होणार आहे.
या सभेला हिंदुत्वाचे धगधगते अग्नी कुंड पालकमंत्री नितेश राणे, बजरंग दल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,हिंदू एकता आंदोलनाध्यक्ष विक्रम पावसकर मार्गदर्शन करणार आहेत या सभेनंतर रात्रो ९ वाजता पारंपरिक नृत्य स्पर्धा होणार आहे,तरी मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here