आमदार नितेश राणे सोमवार २८ ऑक्टोबर रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

0
24

मा.मंत्री नारायण राणे, मंत्री रविंद्र चव्हाण,मंत्री दीपक केसरकर,मंत्री विश्वजित राणे,निलेश राणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती..

कणकवली,दि.२६: भारतीय जनता पार्टीचे कार्यतत्पर आमदार नीतेश राणे हे आपल्या विधासभेतील सलग तिसऱ्या विजयासाठी सज्ज झालेले आहेत. सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदासंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली आणि उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली.
नितेश राणे हे आपला उमेदवारी अर्ज सोमवारी सकाळी १२ वाजता हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवर मंडळी च्या उपस्थितीत भरणार आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली १० वाजता निघणार आहे.,त्यानंतर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून उप जिल्हा रुग्णालय कणकवली समोरील मैदानात जाहीर सभा संपन्न होणार आहे.
यावेळी भाजपा खासदार,माजी मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, गोव्याचे मंत्री आणि कोकण प्रभारी विश्वजित राणे,माजी खासदार निलेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार,माजी आमदार अजित गोगटे तसेच जिल्ह्यातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील भाजपा आणि महायुतीचे हितचिंतक तसेच जनता यांनी मोठ्या संख्येने यात सामील व्हावे असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
लोकसभा विजयानंतर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून जिल्ह्यातील विधानसभेच्या तीनही जागांवर विजय महायुतीचाच असणार आहे.असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या मागील दोन टर्म मध्ये विधानसभा कामकाज आणि भाजपा संघटना यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले.विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि ते महाराष्ट्रातील हिंदू जनतेच्या मनातील ताईत झालेले आहेत.असे असूनही आपल्या संपूर्ण मतदारसंघात त्यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्कामुळे लक्षणीय काम उभे केलेले आहे.म्हणूनच भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात साठ पासष्ट हजाराहून अधिक मताधिक्याची अपेक्षा आहे.
कणकवली,देवगड, वैभववाडी हा मतदासंघ नितेश राणे यांनी आपल्या राज्यातील व्यस्त कामातून सुद्धा त्यांनी एक आदर्श असा मतदारसंघ तयार केलेला आहे.मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे,असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here