सावंतवाडी,दि.२३ : तालुक्यातील ओटवणे देऊळवाडी येथे तब्बल ४० फूट उंच माडावरून खाली कोसळल्यामुळे दीनानाथ गणपत कविटकर (६३)हे गंभीर जखमी झाले.त्याना लागलीच येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्याचे निधन झाले ही घटना सोमवारी सकाळी घडली.याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दीनानाथ कविटकर हे ओटवणे येथील देऊळवाडी परिसरात गेले होते.तेथे नारळ काढण्यासाठी माडावर चढले असता त्यांचा अचानक हात सुटल्यामुळे ते तोल जाऊन खाली तब्बल ४० फूट कोसळले. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे ते अत्यवस्थ झाले,डोक्याला छातीला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तात्काळ नातेवाईकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक अमित गोते, हवालदार मनोज राऊत, पी.जी. नाईक यांनी तात्काळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात भेट देत या घटनेची माहिती घेतली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परीवार आहे. येथील प्रसाद कविटकर यांचे ते वडील होत. तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी दादू कविटकर, तुळशीदास कविटकर, टेम्पो चालक प्रकाश कविटकर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या अकाली निधनाने कविटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.