कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा संपर्क यात्रेचा शुभारंभ..

0
27

जनसामान्यातील लोकसेवक आमदार निवडून द्या.. रुपेश राऊळ यांचे उपस्थितांना आवाहन

सावंतवाडी,दि.१६: येथील विधानसभा कार्यक्षेत्रातील उभाठा शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताह अभियानांतर्गत आज कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून संपर्क यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना काजू , सुपारी कलमाचे व खताचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री राऊळ यांनी जनसामान्यातला आमदार निवडून देऊया, विद्यमान आमदार यांनी थापा मारण्यापलीकडे कोणतेही काम केले नाही. शिवसेनेसोबत गद्दारी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत दगाफटका केला, त्यामुळे हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गावागावात घेऊन जाताना जनतेची सेवा करणारा लोकसेवक हा शब्द पाळणारा, असा आमदार आपण निवडून देऊया त्यासाठी या संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले.

आहे. तसेच या मतदारसंघात आरोग्याचा मोठा प्रश्न आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल झालं असतं तर याचा फायदा येथील जनतेला झाला असता मात्र ते रखडवण्याचे काम येथील स्थानिक आमदारांनी केलं त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत तुमचे प्रश्न सोडवणारा आमदार निवडून द्या अस आवाहन रुपेश राऊळ यांनी उपस्थितांना केलं.

यावेळी वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, संघटिका सौ सुकन्या नरसुले, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, संघटक मायकल डिसोजा, शब्बीर मणियार, शिवदत्त घोगळे, प्रकाश गडेकर, अशोक परब, कौस्तुभ गावडे, बाळू गवस, नामदेव नाईक, वासुदेव होडावडेकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here