मेळाव्यात सायलेज बॅगेचे करण्यात आले प्रात्यक्षिक..
सावंतवाडी,दि.३१ : तालुक्यातील नेमळे येथे आज ३१ डिसेंबर रोजी मलेश्वर सहकारी दूध संस्था नेमळे येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. श्री मुकुंद बचु आंबेरकर या संस्थेच्या ठिकाणी आज सायलेज बॅगेचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
यावेळी गोकुळ संघाचे वैरण विभागाचे व्यवस्थापक श्री भरत मुळे,कोकण विभागाचे संकलन अधिकारी अनिल शिखरे,मळगाव बीएमसी चे प्रमुख डॉक्टर भगवंत केशव गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी बाबाजी धोंड, संदीप नागवेकर, प्रदीप राऊळ ,पुरुषोत्तम पवार, वासुदेव पवार, गणपत कविटकर, कैलास नेरकर, मदन सावंत, सदानंद रेडकर, निलेश पवार, मधुकर अंगचेकर ,उमेश तेंडुलकर ,राजू खानोलकर, अभय साहिल, देविदास राऊत,अजय मुळीक, देविदास राऊळ, प्रशांत देसाई, सुहास कांबळे, मुकेश सावंत, जयराम राऊळ, राजाराम वराडकर, बाळकृष्ण मुळीक, तन्मय आंबेरकर, तनिष आंबेरकर, प्रदीप राऊळ आदी संस्थेचे चेअरमन आणि प्रतिनिधी उपस्थित होते.