सावंतवाडी, दि.३० : केरळ येथील रहिवासी असलेला सायकलस्वार हमरास एम. के. हा युवक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील गड-किल्ले अभ्यासण्यासाठी आला आहे.

महाराष्ट्रात विविध भागात असलेल्या ३६५ गडांवर सायकलवरून प्रवास करत तो नुकताच ‘मनोहर-मनसंतोष गडा’वर पोहोचला. मनोहर-मनसंतोष गडावर जाण्यासाठी तो शिरशिंगे येथे आला असता येथील मंदिरात गावच्यावतीने सरपंच दीपक राऊळ आणि गावकरी मंडळींकडून त्याचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.