ग्रामस्थांचे जिल्हा परिषद उप अभियंता यांना निवेदन…
सावंतवाडी,दि.४: कोणशी ग्रामस्थांच्या वतीने भालावल ते कोणशी या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे गणेश चतुर्थीच्या पूर्वी तोडून घेण्यासंदर्भात ,तसेच हा रस्ता पूर्ण होऊन गेली दहा वर्ष झाल्यामुळे त्याचे योग्यरित्या डागडुजी होत नसल्याने तो लवकरात लवकर जिल्हा परिषद कडे वर्ग करण्यात यावा .याबाबत जिल्हा परिषद चे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, कोणाशी उपसरपंच नाना उर्फ अर्जुन सावंत ,राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस हिदायत उल्ला खान ,अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिका राजगुरू, कोणाशी बूट अध्यक्ष सिद्धेश गवस, विठ्ठल गवस ,दिलीप गवस ,सुनील सावंत ,अनिल गवस ,दीपक गवस ,भरत सावंत, प्रवीण सावंत ,सुभाष गवस, आधी ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.