श्री रामचंद्र घावरे सर यांची वैभववाडी तालुका क्रीडा समन्वयक पदी निवड….

0
122

वैभववाडी,दि.२८: येथील माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या प्रशालेतील शिक्षक श्री रामचंद्र घावरे यांची वैभववाडी तालुका क्रीडा समन्वयक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी बोलताना श्री घावरे यांनी आपण माझी क्रीडा समन्वयक म्हणून नियुक्ती करून माझ्यावर जो विश्वास ठेवलात याचेच फलित म्हणून मी आपल्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्रात वैभववाडी तालुक्याचे नाव लौकिक करेन, आणि या तालुक्यात चांगले खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही उपस्थितांना दिली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी,केंद्रप्रमुख, क्रीडा शिक्षक व आपल्या शाळेतील सहकारी शिक्षक यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here