तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून बैल जागीच ठार..

0
74

घटनेची माहिती मिळताच महावितरणचे शाखा अभियंता घटनास्थळी दाखल..

सावंतवाडी,दि.०६ : येथील मळगाव कुंभारवाडी येथे आज गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास
शेतात गुरांना चारायला नेलेले असताना तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून बैल जागीच ठार झाला.
बैल तडफडत असलेला पाहून त्याच्या दिशेने धावत जाणारा शेतकरी तुटलेली विद्युत वाहिनी पाहून बाजूला झाला. अन्यथा अनर्थ घडला असता. न्हानू दशरथ खडपकर रा . कुंभारवाडी असे या . शेतकऱ्याचे नाव असून शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतकरी हतबल झाला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे हा प्रसंग ओढवला असून आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे शाखा अभियंता अनिकेत लोहार, वायरमन प्रितेश हळदणकर, संतोष गावंकर आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here