सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग येथे लिपिक पदासाठी नोकर भरती..

0
52

सिंधुदुर्ग,दि.०४: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव: लिपिक (Clerk)

एकूण पदे: ७३

महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात: ०५/०९/२०२५

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३०/०९/२०२५

ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: ३०/०९/२०२५ (रात्री ११:५९ पर्यंत)

इतर महत्त्वाची माहिती:

ऑनलाइन परीक्षा: परीक्षेची संभाव्य तारीख आणि प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, आणि इतर सर्व अटी व शर्तींसाठी कृपया बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.sindhudurgdcc.com ला भेट द्या.

निवासी पुरावा: अर्ज करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी असल्याचा पुरावा (डोमिसाइल सर्टिफिकेट) अपलोड करणे बंधनकारक आहे.

अर्ज शुल्क: ऑनलाइन अर्ज भरतानाच शुल्क भरावे लागेल आणि ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

आवश्यक माहिती: उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांचा ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक अचूकपणे भरावा.

अर्ज भरताना मदत: अर्ज भरताना काही अडचण आल्यास CGRS किंवा पोर्टलवरील https://cgrs.ibps.in/ येथे दिलेल्या सूचनेनुसार मार्गदर्शन घ्यावे.

टीप: अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती खरी आणि अचूक असावी. कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
टीप: ही जाहिरात केवळ माहितीसाठी आहे. अधिकृत माहितीसाठी कृपया बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here