कोकणातील तरुणांसाठी काहीतरी करावं या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करते.. हर्षवर्धन साबळे

0
209

सावंतवाडी, दि.०५ : तंत्रज्ञान शेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने कोकणात सावंतवाडी येथे पहिले बिपिओ सुरू केले आहे. यामार्फत स्थानिक २० जणांना रोजगार प्राप्त झाला असल्याची माहिती व्हरेनियम क्लाउड लिमिटेडचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली.
साबळे म्हणाले,मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सावंतवाडीत सुरू केले असून व्हरेनियम क्लाउड लिमिटेड आणि एडमिशन यांनी इफ्रास्ट्रक्चर आणि टेक्निकल सुविधा पुरविली आहे.कोकण बद्दल मला नितांत प्रेम आहे कारण माझी आई ही मूळची कोकणातली आणि म्हणूनच कोकणातील विद्यार्थ्यांसाठी कोकणातील तरुणांसाठी काहीतरी करावं या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करते त्यामुळे एकूणच या विकास प्रकल्पात कोणीही राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करूया असे साबळे यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती म्हणजे कुडाळ येथे कंपनीचे सेंटर होणार असून जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही अशा प्रकारची सेंटर होणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शिक्षण विषयक कोर्सेस कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थांना प्रदान करणार असल्याचे साबळे यांनी स्पष्ट केले. व्हरेनियम क्लाउड लिमिटेड कंपनी मोडेल करिअरच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगगाराच्या संधी येथील स्थानिक युवक – युवतींना देण्यात आल्या आहेत. तर कंपनीकडून सावंतवाडी तालुक्यातील १२ जणांना हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये गोवा आणि बेंगलोर येथे रोजगार प्राप्त झाल्याचे साबळे यांनी सांगितले.
कोकणात हे सगळे प्रकल्प राबविण्यामागे माझा एकच हेतू आहे तो म्हणजे माझी आई मुळची कोकणातील त्यामुळे मला कोकण बद्दल अतिव प्रेम आहे. इथल्या तरुणांसाठी इथल्या महिलांसाठी काही उपक्रम राबवावेत या उद्देशानेच व्हेरेनियम क्लाऊड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी काम करत आहे पुढच्या काळात विविध प्रकल्प या कंपनीच्या माध्यमातून आपण कोकणात आणू यासाठी मला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोणीही यात राजकारण करू नये अशा प्रकारचं नम्र आवाहन यावेळी साबळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here