सावंतवाडी,दि.२९: शहरांमध्ये पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे शहर व्यवस्थापन ला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात ठीक ठिकाणी कचरा रस्त्याच्या कडेला अवस्थ पडलेल्या कचऱ्याचे ढीग दिसत आहेत सार्वजनिक बांधकाम ज्या ठिकाणी नगरपरिषदेकडून सुपरव्हिजन होत नसल्याने कामाचा दर्जाही राहिलेला नाही. स्ट्रीट लाईटच्या संदर्भात तक्रारी करूनही अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत.
प्रशासनाचा दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी चालू आहे. कधी नव्हता एवढा ढिसाळ पणा शहर व्यवस्थापनेमध्ये होत असून याची गंभीर दखल पालकमंत्र्यांनी घ्यावी व सावंतवाडी शहरासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा अशा प्रकारची मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत व प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून केली आहे.