आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस उद्या सावंतवाडीत साजरा होणार.. संजू परब

0
6

सावंतवाडी,दि.१६ : कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस आज दुपारी ४ वाजता सावंतवाडी येथील हॉटेल मॅंगो येथे केक कापून साजरा केला जाणार आहे. संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हा संघटक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी दिली.

तरी या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी निलेश राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मित्र परिवार, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाऊंडेशनच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मंडळी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संजू परब यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here