सावंतवाडी,दि.०६: येथील अपक्ष उमेदवार सौ.अर्चना घारे परब मंगळवारी सकाळ पासून प्रचाराची सुरुवात आपल्या भालावल येथील ग्रामदैवत श्री देवी सातेरी देवीला श्रीफळ ठेवून सर्व देव देवतांचे आशिर्वाद घेऊन केली.
यावेळी भालावल ,कोनशी,सरमळे,नांगरतास, दाभिल,असणीये येथील सर्व मानकरी ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच या नंतर कोनशी ,तांबोळी,असनीये,घारपी, फुकेरी ,वाफोली ,विलवडे ,सरमळे,ओटवणे आदी गावामध्ये प्रचारास गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेछा दिल्या.