सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस संजू परब वाढदिवस विशेष..

0
85

सावंतवाडी,दि.१९: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कुशल युवा तडफदार राजकीय नेतृत्व मित्रांसाठी जीवाला जीव देणारा कार्यकर्त्यांसाठी आधारवड विरोधकांना तिथल्या प्रत्युत्तर देणारा सर्वांचे लाडके बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे सच्चिदानंद उर्फ संजू परब.
संजू परब यांची राणे कुटुंबियांशी अगदी जवळीक असून माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

संजू जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकीय नेता असला तरी त्याने स्वतःला कधीच नेता मानले नाही अगदी नगराध्यक्ष असताना देखील त्याने सर्व मित्रांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी त्यांच्या घराच्या दरवाजे कायम उघडे असायचे कुणालाही कुठल्याही अडचण आली तर सर्वात पहिले आठवण येते ती संजूची कारण संजू कडे जो काम घेऊन जातो त्याचे काम पूर्णत्वास नेल्याशिवाय संजू स्वस्त बसत नाही किंबहुना हेच त्याच्या लोकप्रियतेचे गमक आहे.

डिसेंबर 2019 ला सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि भाजपातर्फे सर्वांच्या मुखी एक मताने नाव आले ते संजू परब यांचे मडूरा सारख्या ग्रामीण भागातून येऊन महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता त्याला राजकारणाची आवड लागली तेव्हा शिवसेना , काँग्रेस व नंतर स्वाभिमान पक्ष व आता भाजप पक्षात त्याचे अस्तित्व ठळकपणे उमटू लागले आहे.
भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी पार्श्वभूमी असलेल्या या निवडणुकीत सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण निलेश राणे नितेश राणे यांच्या विहरचनेने व नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संजू पुरवल्याने ही निवडणूक लढा जिंकून नगराध्यक्षपदी विराजमान झाले आणि कित्येक वर्ष सावंतवाडी नगर परिषदेवर एक हाती वर्चस्व असणाऱ्या दीपक केसरकर यांना हा सर्वात मोठा धक्का होता.
आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्द संजूला आई-वडिलांसोबत त्यांच्याशी योग्य पत्नी संजना तसेच त्यांच्या दोन्ही मुली यांची बहुमोल साथ लागली अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या संजूला आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडियाकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here