सावंतवाडी,दि.१८: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपालिका सफाई कर्मचारी यांना पुंडलिक दळवी यांची कन्या श्रेया दळवी हिच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आपला वाढदिवस गोरगरिबांच्या सानिध्यात करावा आणि आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली गेली पाहीजे.असे मत यावेळी पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले.
यावेळी सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home ठळक घडामोडी आपल्या वाढदिवसानिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत दळवी यांनी जपली सामाजिक...