माडखोल- धवडकी या रस्त्यावर कार व दुचाकी स्वार याच्यात समोरासमोर अपघात

0
77

सावंतवाडी,दि.२४ : येथील वेंगुर्ले- बेळगाव महामार्गावरील माडखोल- धवडकी या रस्त्यावर कार व दुचाकी याच्यात समोरासमोर अपघात होऊन पशुवैद्यकीय परिचय डॉ.अनंत परब ( ५५ ) हे गंभीर जखमी झाले.त्याच्या हातासह डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघात ग्रस्त कार ही मुंबईतील असून त्याचे चालक फौजदार शेख यांनी अपघातानंतर परब यांना तेथेच टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीसांनी त्याला नाट्यमय रित्या पकडले तो पर्यत परब यांना स्वप्निल सावंत यांनी रूग्णालयात दाखल केले.पोलीसांनी ही तत्काळ दखल घेतली त्यामुळे अपघात ग्रस्त कार सापडली.घटनास्थळावर जाऊन पोलीसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.
अपघाताची खबर मिळताच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर व रवी जाधव यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन रूग्णाला सर्व मदत करून सुखरूप घरी सोडले.रूग्णाची प्रकृती ठीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here