सावंवाडीतील राजवाड्यात होणार्या पंचतारांकीत हॉटेलची केली पाहणी…
सावंतवाडी,ता.०८: जागे अभावी रेंगाळलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सुटावा यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सावंतवाडीच्या राजघराण्याची भेट घेतली. यावेळी राजघराण्याची सहकार्याची भूमिका मोलाची आहे. सावंतवाडीत होणार्या हॉस्पिटल मार्गी लावण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करेन, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष तथा सावंतवाडीचे सुपुत्र राहुल नार्वेकर यांनी येथे व्यक्त केला.
यावेळी युवराज लखमराजे यांच्या संकल्पनेतून राजवाड्यात सुरू होत असलेल्या पंचतारांकीत हॉटेलला त्यांनी भेट दिली. अशा प्रकारे पर्यटनाभिमुख प्रकल्प होणे गरजेचे आहेत आणि त्यासाठी आपले कायम सहकार्य असेल, असे त्यांनी सांगितले.
श्री. नार्वेकर यांनी सावंतवाडी दौर्यावर असताना येथील राजवाडयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांच्याहस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, श्रध्दाराणी भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.नार्वेकर यांनी आपण सावंतवाडी संस्थानाचे नातेवाईक लागतो. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बरोबर सावंतवाडीला भेडसावणारे प्रश्न सोडवू, असेही ते यावेळी म्हणाले.