पणजी वेंगुर्ला एसटी बस फेरी पूर्ववत सुरु करा…

0
76

प्रवाशांच्या वतीने वेगुर्ले येथे एसटी आगार प्रमुखांना देण्यात आले निवेदन

वेंगुर्ला,दि.२३ : पणजी कदंबा बस स्थानकावरुन सायंकाळी ६.४० वाजता मार्गस्थ करण्यात येणारी पणजी वेंगुर्ला एसटी बस फेरी पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन प्रवाशांनी वेंगुर्ला आगाराचे सहाय्यक आगारप्रमुख नीलेश वारंग यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र दिनी १ मे पासून पणजी वेंगुर्ला एसटी सुरु करण्याची ग्वाही वारंग यांनी प्रवाशांना दिली .यावेळी जीजी आचरेकर हरेश मुळीक स्वप्नील रगजी उपस्थित होते.
वेंगुर्ला एसटी आगाराची एसटी पणजी कंदबा बस स्थानकावरून सायंकाळी ६ .४० वाजता मार्गस्थ करण्यात येणारी पणजी वेंगुर्ला एसटी गेल्या तीन वर्षापासून बंद ठेवण्यात आली आहे. भारमान मिळत नसल्याने एसटी बंद ठेवण्यात आली आहे मध्यंतरी चार दिवस चार दिवस सायंकाळी पणजी वेंगुर्ला एसटी सुरु करण्यात आली होती.
त्यानंतर लगेच पणजी वेंगुर्ला एसटी फेरी रद्द करण्यात आली एसटी फेरी बंद ठेवल्याने सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारांपासून वंचित राहावे लागत आहे एसटीच्या अधिकाऱ्यांकडून पणजी वेंगुर्ला एसटी फेरी रोज सुरु ठेवण्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत कोंडुरा मळेवाड आजगाव शिरोडा वेंगुर्ला येथे येण्यासाठी रात्रीच्या वेळी एसटीची सुविधा नसल्याने एसटी रोज सुरु ठेवण्यासाठी मागणी प्रवाशांनी निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनावर व्यापारी श्रीकांत पारिपत्ये, सातार्डा ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, मिलिंद जाधव, दशरथ वेंगुर्लेकर, विशाखा पारिपत्ये, डॅा.संदेश गोवेकर यांच्यासह १०८ जणांच्या सह्या आहेत.
सायंकाळची पणजी वेंगुर्ला एसटी बंद असल्याने गोवा राज्यातून मळेवाड शिरोडा वेंगुर्ला याठिकाणी उशिरा येणाऱ्या प्रवाशांची विद्यार्थ्यांची रुग्णांची गैरसोय होत आहे सायंकाळी एसटी बसची सुविधा नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करणे महागात पडत आहे. खासगी वाहनाने प्रवास करताना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे काहिजणांना कामानिमित्त गोव्यात राहवे लागत आहे त्यामुळे सायंकाळची पणजी वेंगुर्ला एसटी बस पूर्ववत सुरु करण्याची मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here