शिरशिंगे येथील सैनिक भवनाच्या इमारतीचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन..

0
65

सावंतवाडी,दि.२७: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी शिरशिंगे गावात नव्याने उभारण्यात आलेल्या “सैनिक भवनाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिरशिंगे गाव हा सैनिकांचा गाव म्हणून ओळखला जातो. या गावात चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्याने या गावात आल्यावर जम्मू काश्मीर मध्ये आल्याची प्रचिती येते. हे मिनी काश्मीर आहे. अशा शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी शिरशिंगे गावाची स्तुती केली.

दरम्यान बोलताना या भागात आगामी काळात पर्यटनच्या माध्यमातून विविध रोजगार उपलब्ध करून देणार व गेली अनेक वर्षे रखडलेले शिरशिंगे धरण याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अर्धवट राहिलेला प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना यावेळी आमदार केसरकर यांनी दिले.

यावेळी बोलताना शिरशिंगे धरण झाल्यास या पंचक्रोशीतील गावे सुजलाम सुफलाम होतील व येथे मोठ्या प्रमाणात हरित क्रांती घडून येईल. हे धरण होण्यासाठी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगितले.
दरम्यान माजी सैनिकांचा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे,गावचे सरपंच दीपक राऊळ, उपसरपंच सचिन धोंड ,माजी पंचायत समिती सदस्य पंढरी राऊळ,माजी सैनिक संघटना अध्यक्ष नारायण राऊळ,उपाध्यक्ष मनाजी घावरे, सचिव दीपक शिर्के, खजिनदार यशवंत राऊळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, माजी उपसरपंच पांडुरंग राऊळ आदी माजी सैनिक गावातील प्रमुख मानकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here