केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.. पालकमंत्री श्री चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास
सावंतवाडी,दि०७ : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सावंतवाडीचे श्री देव पाटेकर मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला.
राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता स्थापन होऊन जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त व्हावी, असे साकडे महायुतीच्या मंत्र्यांकडून घालण्यात आले.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे, युवराज लखमराजे भोसले,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पेट्रोलियम महामंडळाचे अध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, विधानस भाप्रमुख प्रेमानंद देसाई, महिला आघाडी प्रमुख ॲड. निता कविटकर,भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांनी आज गुरुवारी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित महायुतीच्या नेत्यांनी दीपक केसरकर हे या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत विजयी चौकार करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह आ. नितेश राणे यांनीही मंत्री दीपक केसरकर यांचा विजय निश्चित असून महायुतीचे सर्व पदाधिकारी एकसंघपणे प्रचार कार्यात सहभागी झाले असल्याने या मतदारसंघात महायुतीला मोठे मताधिक्य मिळेल असे स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, मंदार नार्वेकर, अंकुश जाधव, माजी उपनगराध्यक्षा अनारोजीन लोबो, माजी नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, संजय पेडणेकर, सुरेंद्र बांदेकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, गुरुनाथ सावंत, परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत, सूरज परब, विनायक दळवी यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.