सावंतवाडी,दि.२६: शहरातील एकमुखी दत्तमंदिर हे एक जागृत दत्तस्थान मानले जाते तर वासुदेवानंद सरस्वती श्रीमद् टेंबेस्वामी हे संपूर्ण भारतभरात दत्त संप्रदायातील भाविक भक्तांचे अंतिम श्रद्धास्थान मानले जातात. श्रीमद् टेंबेस्वामी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी मंदिरात श्री स्वामींचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी भेट देत श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतले. श्री स्वामींच्या पालखीसह प्रदक्षिणा सोहळ्यात त्यांनी सहभाग घेतला. सात जन्मांच्या पुण्याईमुळेच आपणास दत्ताची पालखी घेऊन चालण्याचे हे भाग्य आजच्या दिवशी लाभले अशा भावना विशाल परब यांनी यावेळी सद्गतीत अंत:करणाने व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष दिलीप भालेकर, भाजपा सावंतवाडी तालुका सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, लायन्स क्लब अध्यक्ष अमेय पै, देवस्थान कमिटी सेक्रेटरी जितू पंडित, देवस्थान कमिटी खजिनदार सुधीर धुमे,सहकार चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश पै, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुधीर पराडकर,विनायक पराडकर आदी मान्यवर, तसेच शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.