सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

0
90

सावंतवाडी,दि.१०: सावंतवाडी पोलिस ठाण्या अर्तगत येत असलेल्या आंबोली पोलिस दुरक्षेत्रावर कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर याचा पोलिस सेवा बजावत असताना आज रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.या घटनेने पोलिस दलात एकच हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेनंतर जगदीश दुधवडकर याचा मृतदेह सावंतवाडीत आणण्यात आला असून दुपारनंतर त्याच्या मुळ गावी हलविण्यात येणार आहे.
सावंतवाडी पोलिस ठाण्या अर्तगत येत असलेल्या आंबोली पोलिस दुरक्षेत्रावर जगदीश दुधवडकर हे गेली वर्षभर कार्यरत होते.शनिवारी रात्री त्यानी आपले दैनंदिन कामकाज करून ते झोपी गेले त्यानंतर सकाळी उठून आपले दैनंदिन कामकाज करण्यासाठी तयारी करत असतनाच त्याना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले त्याना पुढील उपचारार्थ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यापूर्वी च त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर सोबत असलेले कर्मचारी चांगलेच हादरून गेले.अनेकांना अश्रू अनावर झाले.दुधवडकर हे गेली अनेक वर्षे सावंतवाडी येथील उपविभागीय कार्यालयात कार्यरत होते.नंतर ते काही काळ सावंतवाडी पोलीस ठाण्यात ही कार्यरत होते त्यानंतर ते मागील एक वर्षापासून आंबोली पोलिस दुरक्षेत्रावर सेवा बजावत असतनाच रविवारी सकाळी उठल्यानंतर ते दुरक्षेत्राच्या आवारात झाडू मारत असतानाच अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.आणि ते खाली कोसळले.
ही घटना कार्यरत असलेल्या इतर पोलिस कर्मचारी यांनी बघितली आणि लागलीच आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.पण दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.ही घटना सावंतवाडी पोलिस ठाण्यात कळविण्यात आली त्यानंतर पोलिस यंत्रणाही चांगलीच हादरून गेली अनेकांना अश्रू अनावर झाले.
आंबोली येथील घटनेनंतर दुधवडकर याचा मृतदेह सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सावंतवाडी रूग्णालयात धाव घेतली दुधवडकर याची पत्नीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.दुपारनंतर दुधवडकर याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी कुडाळ तालुक्यातील कर्ली येथे हलविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here