सावंतवाडी,दि.२३: तालुक्याती ल शिरशिंगे येथील बस सेवा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांपूर्वी माजी आमदार राजन तेली यांनी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर केली होती.
यावेळी शिरशिंगे ग्रामस्थ व सरपंच दीपक राऊळ यांनी धोंडवाडी येथे नऊ वाजता येणारी गाडी पुढे मळईवाडी पर्यंत जावी यासाठी आगर प्रमुखांना निवेदनाद्वारे विनंती केली होती.
आज दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे अशी माहिती गावचे सरपंच दीपक राऊळ यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकार मार्फत कोकण दर्शन डिजिटल मीडियाला दिली आहे.
यावेळी एसटी बसचे स्वागत करण्यासाठी सरपंच दीपक राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप राऊळ,मळईवाडीतील सामाजिक कार्यकर्ते अमित राऊळ, वासुदेव राऊळ,गणपत राऊळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ही बस सावंतवाडीहुन ०७.४५ वाजता सुटेल व ९ वाजेपर्यंत मळईवाडी पर्यंत पोहचेल,.. तरी सर्व गावातील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन सरपंच दीपक राऊळ यांनी केले आहे.