युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मोती तलावाकाठी आगळी वेगळी आतषबाजी…

0
259

सावंतवाडीकरांनी उपस्थित रहावे..विशाल परब मित्र मंडळ व भाजपचे आवाहन…

सावंतवाडी दि.१४ : गेले काही दिवस जिल्ह्यात भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले, श्री परम यांचा उद्या वाढदिवस दिमाखात साजरा होणार आहे. त्याचीच एक झलक म्हणून आज रात्री दहा वाजता मोती तलावाच्या काठावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. एका वेगळ्या यंत्रणेद्वारे आगळीवेगळी ही आतषबाजी असणार आहे. ही आतषबाजी एलईडी स्क्रीनव्दारे गार्डन परिसरात शहरातील नागरिकांना पाहता येणार आहे त्याठिकाणी तेथे बसण्यासाठी खास खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी प्रथमच आगळीवेगळी ही आतषबाजी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी व विशाल परब मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here