.. स्पर्धेत शिवतेज कोल्हापूर संघ विजेता तर डॅडीज लव पार्से संघ उपविजेता ठरला..
सावंतवाडी,दि.१७: येथील जिमखाना मैदान येथे भाजपा युवा नेते संदीप गावडे पुरस्कृत दोन दिवसीय राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत सिंधुदुर्ग महाराष्ट्र गोवा सह कोल्हापूर सांगली सातारा येथील बलाढ्य संघानी सहभाग घेतला होता.
दोन दिवसीय या स्पर्धेतील अंतिम लढत डॅडीज लव पार्से गोवा वर्सेस शिवतेज संघ कोल्हापूर अशी झाली. अंतिम सामना चुरशीचा झाला कोल्हापूर संघाने उत्कृष्ट खेळी करत अंतिम सामन्यात विजेते पद पटकावले तर डॅडीज लव पार्से गोवा हा संघ उपविजेता ठरला.
दरम्यान उपविजेत्या संघाला रोख रक्कम २५ हजार व चषक तर विजेत्या संघाला ५०००० व चषक देऊन गौरवण्यात आले.
भाजपा युवा नेते संदीप गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथे प्रथमच अशी दिव्य भव्य स्पर्धा आयोजित केली होती आणि या स्पर्धेत फुटबॉल खेळाडू सह खेळ प्रेमींनी चांगला प्रतिसाद दर्शवला.
आपल्या जिल्ह्यात क्रिकेट आणि कबड्डी वगळता अशी दिव्य भव्य फुटबॉल स्पर्धा होऊ शकते,आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्हात क्रिकेट आणि कबड्डी खेळाप्रमाणे फुटबॉल खेळामध्ये खेळाडूही घडतील या उद्देशानेच ही स्पर्धा घेतली गेली असे मत भाजपा युवा नेते संदीप गावडे यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान संदीप गावडे यांनी एफसी क्लब सावंतवाडी या लोगोचे अनावरण केले.