दोडामार्ग,दि.२४: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग तर्फे बुधवारी दुपारी दोडामार्ग मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पहलगाम (जम्मू काश्मीर) मध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत घडलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
ह्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत मंत्री राहुल राजौरिया, सिंधुदुर्ग संघटन मंत्री शिवाजी भावसार, कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य विनीत परब,दोडामार्ग शहर मंत्री सिमंथिनी नाईक व इतर दोडामार्ग तालुका कार्यकारिणी सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.