आमदार निलेश राणे यांचे सौ.गावडे यांनी औक्षण करुन केले स्वागत
सावंतवाडी,दि.०५: कुडाळ मालवण मतदार संघाचे निर्वाचित आमदार निलेश राणे यांनी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सिताराम गावडे यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली.
यावेळी आमदार निलेश राणे यांचे सौ सयुक्ता गावडे यांनी औक्षण करून स्वागत केले.त्यांच्यासोबत सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब उपस्थित होते. यावेळी कौटुंबिक गप्पांचा कार्यक्रम रंगला . यावेळी अमेय आरोंदेकर, दया परब,रोशन डेगवेकर आदि उपस्थित होते.