मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली बीएसएनएल कार्यालयाला धडक..

0
137

जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नू यांची भेट घेत नेटवर्क समस्या संदर्भात विचारला जाब..

सावंतवाडी,दि.०९ : तालुक्यातील आरोस गावात मागील तीन दिवस नेटवर्क विना गावकरी त्रस्त असल्याने आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रबंधक श्री जन्नू यांना घेराव घालत वारंवार होणाऱ्या नेटवर्कच्या समस्या विषयी चर्चा केली तर काम सुरू असल्याचे सांगत उद्यापर्यंत आरोस गावातील रेंज पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याचे श्री जन्नू यांनी आश्वासन दिले. तसेच तालुक्यातील इतर गावातील नेटवर्क संदर्भातही चर्चा करण्यात आली तसेच काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या पगारासंदर्भातही धडक दिली होती. त्यानंतर एका ठेकेदाराने संपूर्ण पगार कामगारांचा घातल्याची माहिती ही श्री जन्नू यांनी दिली. तसेच गावातील इंटरनेट संदर्भातही अनेक समस्या असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला तर इंटरनेट व रेंज सुरळीत ठेवा अन्यथा गावातील लोकांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला यावेळी म.न.वि.से जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल केसरकर, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, माजी संपर्क अध्यक्ष महेश परब, कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, बाळा बहिरे, मिलिंद सावंत, सुनील आसवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here