सिंधुदुर्गात हेल्मेट सक्ती…

0
154

विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर करण्यात आली कारवाई

सिंधुदुर्ग,दि.१९: राज्य शासनाने हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू केली असुन.
त्यानुसार आता सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये,शाळा महाविद्यालये, तसेच खाजगी आस्थापनामध्ये काम करणारे कर्मचारी दुचाकी घेऊन जात असतील तर त्यांना आता हेल्मेट घालूनच जावे लागणार आहे.

रस्ता सुरक्षा जन जनजागृती अभियान २०२३ अंतर्गत व मोटर वाहन कायदा १९८८ कलम १२९ व १९४ ड मधील हेल्मेट वापरा संबंधीच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याबाबत गुरुवारी १३ जुलै रोजी उप प्रा.परिवहन कार्यालयाच्या मेन गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकल चालकांना ऑनलाइन चलान देण्यात आले.या कारवाईमध्ये सहाय्यक मोटर वाहननिरीक्षक अरुण पाटील,अभिजीत शिरगावकर,अमित नायकवडी व शिपाई गणेश यांचा सहभाग होता.या या कारवाईमध्ये एकूण सात जणांना चलन देऊन कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here