प्र. श्री. नेरूरकर साहित्यिक पुरस्कार डॉ. पाटकर यांना जाहीर…!

0
124

१४ फेब्रुवारी रोजी पुरस्काराचे वितरण..

बांदा, दि.०६ : नट वाचनालय, बांदा यांच्याकडून दिला जाणारा प्र. श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यंदा डॉ. रुपेश पाटकर यांना जाहीर करण्यात आला आहे.१४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्र. श्री. नेरूरकर यांच्या जयंतीदिनी हा पुरस्कार देण्यात येईल अशी माहिती नट वाचनालयचे सचिव राकेश केसरकर यांनी सांगितले.

पेशाने मनोविकारतज्ज्ञ असलेले डॉ. पाटकर हे गेली सुमार वीस वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिलेले आहे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीना मोफत उपचार देण्यासोबतच पर्यावरण रक्षण, कामगारांचे प्रश्न, कुमारवयीन मुलांच्या समस्या याबाबत भरीव योगदान देत आहेत.

त्यांनी बाजारू लैंगिक शोषणाचे पीडितासाठी काम करणार्‍या ‘अन्याय रहित झिंदगी’ या संस्थेसोबत काम केलेले आहे.
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते सातत्याने लिखाण करत असून त्यांची ” माझ्या आईची गोष्ट, एका शिकारीची गोष्ट, ओपन युवर हार्ट, मद्यपाश एक आजार, कुमारांशी संवाद, पर्यावरणीय बुद्धिमत्ता, अर्ज मधील दिवस, भारतीय तत्त्वज्ञानाची गोष्ट, शोध आबे फारीयाचा, शोध धर्मानंदांचा, मनोवेदनांच्या गोष्टी ” वगैरे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

त्यांना या मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here